विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : जिल्हाधिकारी यांनी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी झुम मिटींगव्दारे दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायत देवळी येथील तलाठी मा. धर्मेंद्र गावंडे यांनी देवळी गावात रेशनकार्ड प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमबाबत ग्रामपंचायत देवळीला माहिती सादर केली असता सरपंच सौ. वैशालीताई विकास सदांशिव तात्काळ गावात दवंडी देवून हि अतीमहत्वाची विशेष मोहिम राबविण्या पुढाकार घेतला. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून रेशनकार्डाचा प्रलंबित कामाचा जलद गतीने निपटारा करणे, नवीन रेशनकार्ड वितरीत करणे, दुय्यम रेशनकार्ड वितरीत करणे, रेशनकार्डमधे नावे समाविष्ट करणे किंवा नावे कमी करणे तसेच फाटलेले किंवा हरवलेले रेशनकार्ड नवीन करुन देणे इत्यादी कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. यात गावकऱ्यांचा फायदा होणार असल्याने ग्रामपंचायत देवळीच्या वतीने सरपंच सौ. वैशाली विकास सदांशिव, तलाठी धर्मेंद्र गावंडे, ग्रामसेवक अमोल खाडे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव, सौ. वृषालीताई बोबडे, सौ. रूपालीताई नवलकार, श्रीमती कल्पनाताई सदांशिव, श्रीमती मंदाताई राऊत, गणेश निमकंडे, ग्रामपंचायत कर्मचारी मनिष म्हस्के, स्वच्छतागृही सुरेंद्र सदांशिव यांनी संपुर्ण गावात घरोघरी जाऊन या विशेष मोहिमेसाठी जागृती अभियान राबविले. गावकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात या विशेष मोहिमेचा लाभ घेतल्याने सदर मोहिम ग्रामपंचायत देवळी येथे यशस्वी झाली सोबतच हि विशेष मोहिम निःशुल्क गावपातळीवर राबविण्याचे निर्देश देणाऱ्या मा. जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडमचे आभार मानले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)