अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी लोकप्रतिनिधींचे वेधले लक्ष.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी 5 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू केले आहे.उपोषणात संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य रशिद शेख,उपाध्यक्ष ज्ञानदिप गलबले,सचिव मिलिंद खेवले,कोषाध्यक्ष सूरज बबनवडे, विकेश सातपुते,चेतन जेंगठे,ज्ञानेश्वर कांबळे,अमित कुकडकर,मनोज सिडाम,निहाल जेट्टीवार,हेमचंद्र पटेवार,राजेश धुपम,प्रदीप दुर्गे,महेश चौधरी,प्रेमसागर जबोर,हितेश दुर्गे,मयुर देवतले आदी उपस्थित होते.दि. 29 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेत बदललेल्या सेवा प्रवेश नियमांमुळे कर्मचार्यांवर अन्याय झाला आहे.ऐन परिक्षेच्या व नियुक्तीच्या काळात नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे सरकारी नोकऱ्यांचे सर्व उमेदवार संपुष्टात आले आहेत.कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीलाही खीळ बसली आहे.50 टक्के राखीव कोटा रद्द करण्यात आला आहे.उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. बारावी सायन्स पास,स्वच्छता निरीक्षक पदविका पास 180 दिवसांच्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र या अटी वेळेवर पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, सेवा प्रवेशाचे नियम कायम ठेवण्यासाठी हा लढा आहे.ईडब्लुएस,माजी सैनिक,अर्धवेळ, भूकंपग्रस्त,प्रकल्पग्रस्त पदे सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये रिक्त आहेत.दुसरा कोट्यातुन पदे त्वरित भरण्यात यावा. जिल्हा परिषद भरतीबरोबरच गट क आणि ड ची परीक्षा लवकरात लवकर द्यावी.दि. 28 फेब्रुवारी 2021 च्या पेपर मधील उमेदवारांपैकी उर्वरित 50 टक्के उमेदवारांची गुणवत्तेवर निवड झाली पाहिजे आणि 100 टक्के भरती पूर्ण झाली पाहिजे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पात्र उमेदवार न मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पदभरतीत 90 गुण असलेल्या पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी करणारी निवेदने गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आली आहेत.मात्र,मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने याठिकाणी उपोषण करून मागण्या पूर्ण करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.