आरमोरी तालुका कोतवाल संघटनेची त्रीमासिक बैठकीचे आयोजन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आरमोरी:- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्रशासकीय भवन तहसील कार्यालय येथे दि.4 मार्च रोजी आरमोरी तालुका कोतवाल संघटनेची त्रिमासिक बैठक पार पडली.या बैठकिच्या अध्यक्षस्थानी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याण कुमार डाहाट हे होते.6 फेब्रुवारी 2019 आणि 1 मार्च 2019 चे शासन निर्णयानुसार तालुक्यातील एकूण 34 कोतवाल कर्मचारी यांना अटल निवृत्तीवेतन योजना,राज्य सरकारी कर्मचारी अपघात विमा योजना,राज्य सरकारी अपघाती वेतनी पॅकेज,महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील कोतवाल कर्मचाऱ्यांना लागू केल्याबद्दल तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष तथा राज्य संघटक गोपाल ठवरे यांनी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याण कुमार डाहाट यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.तहसीलदार आरमोरी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की,तहसील आणि साझ्याचे कामे करतांना कोतवाल वर्गाने जबाबदारीने कामे करावे.शासकीय योजना स्थानिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्यास कोतवाल वर्गाचा मोठा वाटा आहे.स्थानिक पातळी वरील महसुली कामे कोतवाल वर्ग चांगल्या पद्धतीने पार पाडीत आहेत.आणि यापुढेही चांगले कामे करावे.आपल्या पगारातून शक्य होईल तेवढे काही प्रमाणत बचत करून ही बचत भविष्यात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मदत होईल.असे मोलाचे मार्गदर्शन केले.गोपाल ठवरे यांनी आपल्या प्रास्ताविकेत शासन निर्णयानुसार विविध योजनेतून प्रत्येक कोतवाल वर्गाला शासकीय विविध योजना कशाप्रकारे लागू केलेत.हे सर्व करतांना आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याण कुमार डाहाट यांची आम्हाला वेळोवेळी साथ आणि मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच हे सर्व शक्य झाले. तसेच तहसील कार्यालयाचे दिलीप जाऊंजालकर,लिपिक शशिकांत सिडाम,प्रशांत भैसारे यांनी आपला वेळात वेळ काढून वेळोवेळी मोलाची साथ दिली व मदत केली.या बद्दल सर्वांचे कोतवाल संघटनेच्या वतीने शाब्दिक आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन गोपाल ठवरे तालुका अध्यक्ष तथा राज्य संघटक महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांनी केले.तालुका कोतवाल संघटनेचे सचिव रणजीत कनाके,उपाध्यक्ष रंजीत मोहदेकर,बंडू कांबळे,दीपक लिंगायत,चंदू मेश्राम,हेमंत जांभूळकर वनिता भोयर,रेखा खोडवे,कविता हरगुळे,अरुणा आलम,प्रियंका गेडाम,विनुता सडमेक सोबत तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.


