पेरमिली परिसरात समाजकार्य व डाक विभागात उत्क्रुष्ट कामगिरी.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील रहीवासी असलेले तसेच पेरमिली डाक विभागात 12 वर्षापासुन पोस्टमास्तर या पदावर कार्यरत असणारे श्रीनिवास बंडमवार यांनी समाजकार्यात पेरमिली परिसरात उत्क्रुष्ट कामगिरी केल्याची दखल पेरमिली पोलीसांनी घेतली आहे.या निमित्याने दि.28 फेब्रुवारी रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.पेरमिली डाक विभागात कार्यरत असलेले श्रीनिवास बंडमवार हे भारतीय टपाल विभागात काम करत असताना परिसरातील नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने उपपोलीस स्टेशन पेरमिलीने आयोजित केलेल्या विविध लोकाभिमुख नागरी उपक्रमांमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी केलेले सामाजिक कार्य निश्चितच प्रशंसनीय असून त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती आदर व विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली होती.त्यामुळे उप पोलीस स्टेशन पेरमिली पोलीसांनी त्यांच्या कार्याची दखल घेवुन पेरमिली येथे झालेल्या मेळाव्यात त्यांना शाल,श्रीफळ व प्रमाणपञ देवुन सत्कार करण्यात आले.यावेळी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोलीस उपनिरिक्षक अजय राठोड, गंगाधर जाधव,बिमलराज सी द्वितीय समादेशक सिआरपीएफ,संतोष कुमार सिआरपीएफ,सुनिल कुमार सिआरपीएफ,वरिष्ठ पञकार डाँ.दुर्गे,आशिफखान पठाण,डाक विभागाचे एम.ओ.धनपाल तलमले तसेच डाक विभागाचे सर्व कर्मचारी व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.