किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाद्वारा सुरु करण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत स्थानिक ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्रावर महाशिवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजयोगिनी बी. के. लीना दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज, पातूर ह्या असून मुख्य अतिथी म्हणून सावित्रीताई राठोड, उपाध्यक्षा, जि. प. अकोला, श्री हरीष गवळी ठाणेदार, पोलीस स्टेशन, पातूर,सुनिताताई टप्पे, प. स. सदस्या, संजय फाटकर, माजी सरपंच, बाभुळगाव, शिवहरी खेकडे, हिरासिंग राठोड तसेच राजयोगिनी बी. के. प्रभादीदी व प्रा अतुल विखे मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम शिवपूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कु. तन्वी, कु. मधुरा व कु. गौरी यांनी स्वागत व शिव महिमा नृत्य सादर करून अतिथींचे स्वागत केले. बी. के. प्रभा दीदी यांनी प्रस्ताविक व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रा अतुल विखे यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय, कार्य व उद्देश स्पष्ट केले. सर्व अतिथींनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्यात. मा. हरीश गवळी यांनी आजच्या परिस्थितीमध्ये आध्यात्मिकतेची आवश्यकता स्पष्ट करतांना मानसिक शांती व समाजिक सुव्यवस्थेसाठी मेडिटेशनचे महत्व विषद केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बी. के. लीना यांनी महाशिवरात्री महोत्सवाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की परमपिता परमात्मा शिव सर्व मनुष्य आत्म्यांचे पिता असून सत्यज्ञान व सहज राजयोगाच्या माध्यमातून सर्वांना दुःखातून मुक्त करीत आहेत व सुख, शांती, प्रेम, शक्ती, खुशी प्रदान करून सर्वांचे कल्याण करीत आहेत. तसेच सर्वांना विकारांपासून मुक्त करून नवीन स्वर्णिम दुनियेत नेण्याचे पावन कार्य करीत आहेत. उपस्थित सर्व अतिथींचे सेवाकेंद्राच्या वतीने शाल,श्रीफळ, भेटवस्तू व प्रसाद देऊन बी. के. लीना दीदींनी सत्कार केला. या नंतर उपस्थित सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बी. के. अविनाश यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ब्रह्माकुमारीज पातूर सेवाकेंद्राच्या सर्व भाऊ बहिणींनी अथक परिश्रम घेतले. पातूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.


