सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागात असलेले उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे दि.28 फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून तसेच अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जागतिक भौतिक दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली पोलीस दल व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे भारतीय डाक मेळावा आयोजित करण्यात आला.आजच्या तंत्रज्ञान युक्त आधुनिक भारतात जेथे बॅकाचे खाजगीकरण व विलीनीकरण झाले आहे आशा वेळी भारत सरकारची एकाधिकारशाही असणारी जनतेला अविरत सेवा देणारा विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग होय सदर विभागाची स्थापना ही ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात १६८८ साली झाली. तेव्हापासून सदर विभाग आपली सेवा व कार्य अखंडितपणे करत आहे. सध्या भारतीय पोस्ट विभागाला बँकेचा दर्जा मिळालेला आहे परंतु गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागातील बऱ्याच नागरिकांना या विभागाबद्दल माहिती नसल्यामुळे काही बनावट खाजगी बँक व्यवसायी, दलाल लोकांकडून जनतेचि आर्थिक फसवणूक होत असते.येथील नागरीकांना भारतीय पोस्ट विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन विमलराज सी द्वितीय समादेशक सीआरपीएफ,संतोष कुमार सहायक समादेशक सीआरपीएफ,धनपाल तलमले एमओ डाक विभाग आलापल्ली,वरीष्ठ पत्रकार शंकर दुर्गे,असिफखान पठाण,मुख्याध्यापक मेश्राम उपस्थित होते.तसेच पेरमिली पोस्ट विभागाचे शाखा डाकपाल श्रीनिवास बंडमवार,गणपत दहागावकर पेरमिली,ज्ञानेश्वर राजेगोरे, अक्षय जाधव कासमपल्ली,किरण राऊत पले,चांगदेव हंडीबाग येरमनार,समन्ना कंबगोनीवार कुरूमपल्ली,दिव्या अलामे कुरुमपल्ली,सुरेश जाकेवार मेडपल्ली,अतुल गौतम,किरण सहाणे आरेंदा हे मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सदर मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.सदर मेळाव्यामध्ये पेरमिली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये गडचिरोली पोलीस दल,पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत जनकल्यानाकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच प्रत्येक नागरिकांनी डाक विभागाच्या अनेक योजनांचा घ्यावा.असे आवाहन केले.तसेच मेळाव्याचे प्रमुख पाहुणे धनपाल तलमळे एमओ डाक विभाग आलापल्ली यांनी डाक विभागातर्फे नागरीकांकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना आवर्ती ठेव योजना,सुकन्या समृद्धी योजना,पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पंतप्रधान विमा योजना,अटल पेन्शन योजना,किसान विकास पत्र याबाबत माहिती दिली,तसेच डिजीटल इंडिया उपक्रमांतर्गत सध्या पोस्टाचे व्यवहार ऑनलाईन झाले असून इंडीया पोस्ट पेमेंन्ट बॅकच्या सुविधेबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.सदर मेळाव्यात उपस्थितांना पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला तसेच नागरीकांचे पोस्ट अकाऊंट काढुन दिले.मेळाव्या दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत लोकांकरिता उत्कृष्ट काम करणारे श्रीनिवास बंडमवार पोस्ट मास्टर,पेरमिली यांचा उप पोलीस स्टेशन पेरमिली,सर्व पत्रकार संघ तसेच पोस्ट विभागातर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.सदर मेळाव्याच्या यशस्वीते करीता प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोउपनि अजय राठोड, पोउपनि गंगाधर जाधव, पोहवा/रविंद्र बोडे,अशोक मेंढे,विजय बिश्वास, पोशि/ विवेक सिडाम,ब्रिजेश सिडाम, राहुल खार्ड,मधुकर आत्राम,महेश दुर्गे, राकेश उरवते,शंकर चव्हाण, पंकज दंडिकवार तसेच जिल्हा पोलीस,सीआरपीएफ व एसआरपीएफ अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.सदर मेळावा आयोजित केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.