महेश बरगे
ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड : तालुक्यातील जांबुवंत महाराजांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. रावणाने सीतेचे हरण केले होते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना अनेक पशुपक्षी यांनी मदत केली होती,यामध्ये अस्वलाच्या अवतारामध्ये असलेले जांबुवंत महाराज होते. प्रभू रामचंद्र कोणताही निर्णय घेण्याआधी वयाने जेष्ठ असलेले जांबुवंत महाराजांचा सल्ला घ्यायचे.तेव्हा जांबुवंत महाराज ज्येष्ठ सल्लागार होते. हनुमानानंतर प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त म्हणून जांबुवंत महाराज यांची पौराणिक ओळख आहे.प्रभू रामचंद्र आणि सीता माता लंकेतून परत आल्यानंतर सर्वांना बक्षिसे दिले, जांबुवंत महाराजांनी एकांतात निवास्थान मागितले व तसेच प्रभुरामचंद्रा बरोबर मल्ल युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली.प्रभू रामचंद्रांनी पुढच्या अवतारात मल्लयुद्ध खेळण्याचे वचन दिले.प्रभू रामचंद्राने त्यांची एकांत निवासस्थानाची इच्छा पूर्ण करत पुढील अवतारात म्हणजेच श्रीकृष्ण अवतारात मल्लयुद्ध खेळण्याची इच्छा पूर्ण केली. जांबुवंत महाराजांचे निवासस्थान असल्याने या गावाला जामखेड नाव पडले असे सांगितले जाते. हे देवस्थान जागृत असून नवसाला पावनारे जांबुवंत महाराज आपली कुठलीही इच्छा पूर्ण करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.इथे रोज हजारो भाविक दर्शनाला येत असतात .अगोदर जांबुवंत महाराजाची फक्त गुंफा होती. 1994 साली लोकवर्गणीतून मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. त्यानंतर या ठिकाणाला पर्यटन स्थळ दर्जा मिळाला त्यामध्ये थोडाफार विकास झाला. आणि मंदिर संस्थानाला गट क दर्जा मिळाला मंदिर संस्थानकडून आषाढी,कार्तिकी ,गुढी पाडवा, महाशिवरात्री यात्रा भरवली जाते. यावेळी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.मंदिर संस्थान आणि भाविक भक्तांच्या सहकाऱ्यांनी इथे अन्नछत्र सुरू केले यामध्ये वर्षभर म्हणजे 365 दिवस अन्नदान सेवा सुरू झाली. जांबुवंत महाराजांचे मंदिर आणि एक पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र लौकिक आहे .जांबुवंत मंदिर संस्थान आणि पर्यटन स्थळाला गट ब चा दर्जा मिळावा आणि विविध प्रकारे विकास कामे व्हावे, जास्तीत जास्त निधी प्राप्त झाला पाहिजे रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, भक्तनिवास, पार्कींग सुविधा व्हावी अशी इच्छा संस्थान आणि भाविक भक्तांची आहे..