विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर नंदापूर येथे एका शेतात२८ फेब्रुवारी ला विहिरीमध्ये ब्लास्टिंग मारीत असताना पिंजर पोलीस स्टेशन ठाणेदार अजयकुमार वाढवे यांना सुगावा लागताच बीट इन्चार्ज राजू वानखडे, अभिजीत शिरसाठ, चंद्रशेखर गोरे, हे ताबडतोब घटनास्थळी पोचहले. अमित पाटील यांच्या शेतामध्ये विहीर स्फोटक पदार्थ असलेल्या डिटोनेटर ने ड्रिल मशीन द्वारे हलगर्जीपणा कृत्य करीत असताना आढळून आले. स्फोटक पदार्थ असलेल्या बिना परवाना काम चालू असल्याचे आढळले असता तीन आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर व स्फोटक पदार्थ ५ लाख २२ हजार रुपयाचा माल पिंजर पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, बीट इन्चार्ज राजू वानखडे, अभिजीत शिरसाट हे करीत आहेत.