सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेले देचलीपेठा येथे केंद्रिय रिजर्व पुलीस बल 9 बटालियन चे कमांडेन्ट आर.एस.बाळापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.26 फेब्रुवारी रोजी सिवील अँक्शन प्रोग्राम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुखनपल्ली व सिंदा या गावात चार सौर पथदिवे बसविण्यात आले व देचली, पेठा, असली, सिंदा आदी गावात 25 रेडिओचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिआरपीएफ चे मोहम्मद शकील सहाय्यक कमांडंट,देचलीपेठा चे प्रभारी अधिकारी सुधीर साठे,भरत वर्मा,अभय माकणे,पेठा गावचे सरपंच शांता सिडाम,देचलीचे सरपंच दिवाकर मडावी,परिसरातील नागरिक,जिल्हा पोलीस व सिआरपीएफ चे जवानाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.