पातुर : स्थानिक पातूर येथील गुरुवार पेठ भागात महाशिवरात्री उत्सव हर्षोलासात साजरा करण्यात आला . यावेळी भगवान महादेव गँगे ला आपल्या जटा मध्ये सामावून घेण्याचा नयनरम्य देखावा करण्यात आला होता. तसेच महादेव पिंड ठेवण्यात आली होती. यावेळी सामूहिक आरती करून गुरुवार पेठ वासीयांतर्फे फराळ,फ्रुट वाटपाचा कार्यक्रम भाविक भक्तासाठी ठेवण्यात आला होता . या फराळ चा आस्वाद शेकडो भाविक भक्तांनी घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्विकरणासाठी डॉ सचिन बोबंटकार, बालू वानखडे,गणेश इंगळे,सचिन बारोकार,प्रकाश वालोकार,चेतन इंगळे,छत्रपती गाडगे,उमेश काळपांडे,नंदन काळपांडे,योगेश वालोकार,प्रभुदास बोबंटकार,बंटी पोपळघट,प्रवीण तायडे,चंदू इंगळे,प्रज्वल भाजीपाले,केशव बोबंटकार,राजू काळपांडे,पकंज बोचरे, अभिजित तायडे,शिवम वालोकार,अनिल गाडगे, विनोद बोबंटकार,भूषण बंड, प्रदीप कुरोडे,विजय इंगळे यांनी परिश्रम घेतले.


