प्रगती बा. देशमुख मोर्शी जि.अमरावती
व्यवस्थापकीय संपादक
मोर्शी : ह.भ.प. वसंतराव मुघल महाराज यांच्या हस्ते संगीतमय कथेतून एकनाथी भागवत सप्ताहाचे महत्व सांगण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या महापर्वावर ह.भ.प.मुघल महाराज यांनी महाशिवरात्री महत्व पटवून दिले. एकनाथी भागवत यामध्ये जीवनाचा सार सांगितलेला आहे. या महाशिवरात्रीच्या पर्वावर सुरू असलेल्या एकनाथी भागवताला या वर्षी 14 वर्ष पूर्ण झाले, सर्व गावकरी मंडळी , वारकरी टाळकरी मंडळी या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे सहभागी होऊन चांगले सहकार्य करतात. ह.भ.प. मुघल महाराज यांच्या संगीतमय एकनाथी भागवताला त्याच्या संच्याचे मोलाचे सहकार्य मिळते. महाशिवरात्रीला गावच्या सरपंच्या सौ. शुभांगीताई मोगरकर यांच्या हस्ते शंकर पार्वती यांचे पूजन करण्यात आले.

शिवरात्रीच्या निमित्याने सुंदर रांगोळी साकारण्यात आली. शिवरात्रीचे महत्व ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली संगीतमय श्री. एकनाथी भगवताची सुरुवात 25 फेब्रुवारी ला झाली, आणि भागताची समाप्ती 4 मार्च ला आहे. 3 मार्च ला सायंकाळी 6 वाजता शोभा यात्रा निघणार असून गावातील सर्व वारकरी मंडळींचा सहभाग असणार आहे.

टाळ्यांच्या गजरात पूर्ण पिंपळखुटा नगरी दुमदुमनार महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरु आपल्याला समजावून सांगत आहेत. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणार्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात.


