मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : अमृत महोत्सव बाबतचे विविध उपक्रम राबविण्यात बाबत निर्देश मिळाल्या नुसार आज दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी हिवरखेड येथील तलाठी कार्यालयात समाधान दिवस समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्थानिक तलाठी कार्यालय व मंडळ मुख्यालय येथे शेतकऱ्यांसाठी अमृत महोत्सव निमित्य समाधान शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांच्या 7/12 , 8 अ बाबतच्या सर्व समस्यांचे समाधान करण्यात आले, तसेच शेतकऱ्यांचे इतर समस्यांचे निराकरण सुद्धा करण्यात आले आहे. यावेळी मंडळ अधिकारी झापे, तलाठी एस एम तेलगोटे, तलाठी व्ही एस मावळे,, तलाठी प्रतीक इंगळे, तलाठी महेश राठोड, तलाशी तलाठी निलेश ठाकरे , तलाठी किशोर गायकी , कोतवाल राजेश ठाकरे आधी सर्व तलाठी यांनी पूर्ण दिवस तलाठी कार्यालयात बसून सर्व शेतकऱ्यांच्या समस्याचे समाधान केले. अमृत महोत्सव निमित्त या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मनोगत तलाठी किशोर गायकी यांनी व्यक्त केले.