सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : मराठा समाजाला आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले , २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला मेहकर सकल मराठा समाज यांणी पाठींबा दर्शवत एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे करण्यात आले. त्यावेळी गणेश गोळे इंद्रजित देशमुख विजय वायाळ अमर घोडे सुमित धोटे समस्थ मराठा समाजाने पाठींबा दर्शविला आहे.