वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : तालुक्यात येत असलेल्या येवती तेथे वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या अवलिया सद्गुरु सती सोना माता यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त गेल्या ७ दिवसा पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्याने आज श्री श्रेत्र डोमाघाट येते मोठ्या आनंदाने सती सोना माता यांची ४१ वी पुणयतिथी मोहस्तव साजरा करण्यात येते आहे गेल्या ४१ वर्षा पासुन हा मोहस्तव साजरा करतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमा निमित्त आज माऊली ची चरण पादुका मिरवणुक काढण्यात आली व ह भ प नारायण महाराज पडोळे यांची काल्याची कीर्तन सेवा होईल व महप्रसादा कार्यक्रम होईल व कार्यक्रमाची सांगता होईल.