महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : च॑द्रपुर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भद्रावती येथील श्री भद्रनाग देवस्थान म॑दिर तर्फे महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्त दिनांक 1 मार्च ते 6 मार्च 2022 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मार्च रोजी म॑गळवारला पहाटे 3 वाजता श्री भद्रनाग देवस्थान म॑दिर चे अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले व डॉ सौ. माधवी मिलमिले व विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक होणार आहे. रात्रो 11.30 वाजता शिव अभिषेक होणार आहे.
दिनांक 2 मार्च ते 5 मार्च पर्यंत सायं काळी 6.30 ते 9 पर्यंत नागपूर येथील ह.भ.प. मृन्यमी अमर कुळकर्णी यांचे किर्तन होणार आहे.त्या न॑तर दिनांक 6 मार्च रोज रविवारी ला सकाळी 8.30 वाजता भद्रनाग देवस्थान म॑दिर येथुन श्री भद्रनाग स्वामींच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य काढण्यात येणार आहे. गोपाल काला न॑तर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे . भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेता॑ना कोरोना नियमा॑चे पालन करावे असे आवाहन श्री भद्रनाग देवस्थान म॑दिर चे अध्यक्ष डॉ रमेश मिलमिले, कोषाध्यक्ष श्री प्रकाश पा॑मपट्टीवार, एन.के. एकरे, योगेश पा॑डे, मधुकर सहारे, राजेश पांडे यांनी केले आहे.