सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : कुरखेडा येथे राज्यव्यापी संपर्क कामगारांचे आंदोलन स्थानिक पंचायत समितीच्या आवारात विविध संघटनांच्या राज्यव्यापी संपर्क कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी,शिक्षक कर्मचारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग,गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर,शालेय पोषण आहार विभागाचे पर्यवेक्षक विवेक नाकाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी सभा घेण्यात आली.तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी.यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे न्याय मागितला.यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष खिरेंद्र बांबोळे,महिला आघाडी प्रमुख वैशाली कोसे,जि.प.लिपिक संघटनेचे पराग राऊत,जि.प.कर्मचारी महासंघाचे अरविंद मांडेकर,लक्ष्मीकांत मेढे,रुपेश सक्सेना,जुनी पेंशन हक्क संघटनेचे तुळशीदास नरोटे,शिवचंद्रनमंद पाटील,जिल्हा कोषाध्यक्ष गणेश काटेंगे, सरचिटणीस केशव पर्वते, गुलाब सोनकुकरा यांनी प्रास्ताविक केले.प्यारेलाल दौडाश्री, जयदेव बनसोड, दिलीप पाडा, धर्मराव वट्टी,दिनकर राऊत,चंद्रकला हिडामी,मेघराज फुलकवार,देवा मलगम,अनिल लोहे,जोत्स्ना परचाके,अर्चना गिरडकर, वंदना ठाकरे,दीपाली नैताम,ललिता कुमरे आदी यावेळी उपस्थित होते.