मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : येथे श्री संत गजानन महाराजांचा१४४वा प्रकट दिन उत्सवांच्या निमित्याने स्वस्तिक कॉलनी वसाहत मधील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान कडून मोठ्या उत्साहात साध्या पद्धतीने दि. १६ते२३ फेब्रुवारी बुधवार पर्यंत साजरा करण्यात आला प्रकट दिनाचे औचित्य साधून बुधवारी रोजी सह हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सलग३७ वर्षापासून हा महोत्सव पार पडत आहे यावर्षी सप्ताहभर आचार्य आप्पा महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा व श्री गजानन विजय चरित्र पारायण होऊन सर्वश्री हभप देविदास महाराज वानखडे, हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ,हभप विठ्ठल महाराज कोरडे, हभप बळीराम महाराज दौड,हभप राजेश महाराज सावरकर, हभप देवेंद्र महाराज रेखाते, हभप विठ्ठल महाराज तेल्हारकर, व हभप देवराव महाराज यांचे हरिकीर्तन पार पडली यांना संगीत साथ मुन्ना ताथोड पुरुषोत्तम इंगळे ज्ञानेश्वर काळे ज्ञानदेव वाघ नागापुरे गुरुजी व पंचक्रोशी पंचक्रोशीतीक टाळकरी यांची होती गण गण गणात बोते. .. ज्ञानोबा माऊली तुकाराम. .. जय जय राम कृष्ण हरी. .. या सह ताळ मृदंगाच्या गजराने हिवरखेड नगरी दुमदुमली होती शासनाच्या नियमाचे पालन करत भाविक भक्तांनी श्री चे दर्शन घेतले या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे मनिष भुडके संजय मानके किशोर वानखडे अमोल अढाऊ गोपाल कोरडे सत्यविजय गावंडे चैतन्य खारोडे प्रशांत पिंजरकर प्रथमेश भुडके ओम भोपळे सुनील गिरे गणेश भोपळे अनिल पाटील सित्रे स्वप्नील राऊत उल्हास विशाल भड सुरेश भुडके शैलेश भड देशमुख गुरुजी यांनी अयक परिश्रम घेतले.











