सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : विज्ञानाचे नियम पाळा,अंधश्रद्धेला टाळा श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नको आपली श्रध्दा असेल तर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होते आणि त्याला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड असेल तर तेच काम सुखकर होते.दि.26 फेब्रुवारी रोजी धर्म शुद्धीकरण चळवळीचे आद्य प्रणेते स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंती निमित्त उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे अंधश्रद्धा निर्मूलन व प्रर्वतन कार्यक्रमार्तगत पेरमिली हद्दीतील गाव पाटील,पुजारी वर्ग व प्रतिष्ठित नागरीक यांच्या करीता जन मैत्री मेळावा आयोजित करण्यात आले.सदर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.ईशान तुरकर,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जाधव,वैरागडे तसेच मेळाव्याचे आयोजक उप पोलीस स्टेशन पेरमिली चे प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड असे होते.सदर मेळाव्यात पोलीस प्रभारी अधिकारी देशमुख यांनी उपस्थितांना गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक,सामाजिक व धार्मिक रचनेबाबत माहिती दिली व जिल्ह्यातील गरीब,निरक्षर,भोळसर जनता कशाप्रकारे अंधश्रद्धेवर विसंबून आपल्या मौलिक जीवनाचा ह्रास घडवत आहे.या बाबतीत मार्गदर्शन केले.तसेच जादूटोणा कायद्याची माहिती देवुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ईशान तुरकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लोकांमध्ये असलेल्या कमालीच्या अंधश्रद्धेविषयी माहिती दिली.गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभाग मार्फत गरोदर माता,स्तनदा माता,बालके व वयोवृद्ध नागरीक यांच्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.उपस्थितांना आवाहन केले की,गावातील आजारी व्यक्ती यांना पारंपरिक अंधश्रद्धेवर अवलंबून असलेल्या उपचारापेक्षा,तत्रज्ञानयुक्त वैज्ञानिक उपचाराचा अवलंब करावा निरोगी आयुष्य व्यतीत करावे.सदर मेळाव्याचे आभार प्रदर्शन पोउपनी राठोड यांनी केले.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोउपनी अजय कुमार राठोड,जिल्हा पोलिस,एसआरपीएफ चे अमलदारांनी उत्स्फूर्तपणे श्रम घेतले.