महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथील आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या ग्राम शाखे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन आष्टा ग्राम पंचायत चे सरपंच चांगदेव भाऊ रोडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य व संघटनेचे पदाधिकारी हरिष कारमेंगे ,पंकज भरडे, गजानन कारमेंगे , चेतन कारमेंगे,राहुल नन्नावरे, दिनेश भरडे तसेच गावकरी उपस्थित होते.