किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसीच्या कॅडेट्सनी पोलिओ डोस या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन पोलिओ निर्मूलनाचे कार्य केले. 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे तालुक्यातील विविध गावांमधून विद्यार्थी शिकायला येतात त्यामुळे तालुक्यातील पातुर ,शिर्ला, भंडारज, नांदखेड, वरखेड, वाघजाळी ,खानापूर, आगीखेड ,बोडखा ,पास्टूल आदि गावात जाऊन एनसीसीचे कॅडेट्स गावांमध्ये असलेल्या बुथवरती जाऊन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन शासकीय रुग्णालय पातुर येथील मेडिकल ऑफिसर डॉ चिराग रेवाळे, डॉ. कैलास डाखोरे, आरोग्य सहायिका उमाताई कागटे, इंगोले मॅडम, गिरकर मॅडम, तायडे सिस्टर ,सुरवाडे सिस्टर यांनी केले. कॅडेटसला मार्गदर्शन लेफ्टनंट कर्नल श्री चन्द्रप्रकाशजी भदोला आणि सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर पातुर यांनी केले. एनसीसीच्या कॅडेट्सचे कौतुक सचिव स्नेहप्रभादेवी गहलोत, व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य एस बी ठाकरे, अंशुमनसिंह गहिलोत यांनी केले.