अमरावती : रशिया आणी युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाले आहेत, तर अमरावती शहरातील आठ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती अमरावतीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तर रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अमरावती जिल्ह्यातील कोणी नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या, तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. दरम्यान अशा युद्ध स्थितीत भारत सरकारने लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणावं अशी मागणी युक्रेन मध्ये अडलेल्या विद्यार्थी साहिर तेलंग यांचे वडिल प्रेसनजित तेलंग यांनी केली आहे. युद्ध स्थिती असल्याने पालकांना चिंता लागली आहे.