किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : जय बजरंग माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, चान्नी येथे स्काऊट गाईड विभागामार्फत स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त चिंतन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जय बजरंग मंडळ चान्नीचे संस्थापक संचालक मा. गजाननभाऊ इंगळे यांनी भूषविले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. गजानन तऱ्हाळे सर व श्री.संजय जायभाये सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी अमर बंड, शुभम ताले, रेणुका बनचर, आरती बुंधे या स्काऊटस् व गाईडस् नी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन स्काऊट शिक्षक श्री. वसंत ढोकणे यांनी केले. यावेळी तृतीय सोपान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या स्काऊटस् व गाईडस् ना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात शिस्त, स्वावलंबन, देशभक्ती या गुणांचा परिपोष होण्यासाठी स्काऊट गाईड चळवळीचा उपयोग होतो असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा. गजाननभाऊ इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन गाईड शिक्षिका कु.भावना भांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य श्री.संग्राम इंगळे यांच्या मार्गदर्शनात स्काऊट विभाग व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले


