महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती शहरातील गौतम नगर येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुकेश भाऊ जीवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासनस्तरावर आम्ही शिवसेनेच्या मदतीने आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन मुकेश भाऊ जीवतोडे यांच्याकडून देण्यात आले. तसेच नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख भद्रावती तथा नगरसेवक यांच्याकडून स्थानिक स्तरावर मदतीचे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी महेश जीवतोडे तालुका प्रमुख युवासेना भद्रावती, दिनेश यादव नगरसेवक वरोरा, आलेख रट्टे युवा सेना शहर प्रमुख वरोरा, जीवतोडे काकाजी, घाडगे काका जी, अतुल भाऊ नांदे, जीवतोडे ताई अंगणवाडी सेविका तसेच भद्रावती शहरातील सर्वच अंगणवाडी सेविका व वार्डातील असंख्य महिला उपस्थित होत्या.