शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : नंदीग्राम येथे कार्यक्रमाचे आयोज संपूर्ण महाराष्ट्राला अचूक हवामान अंदाज देऊन शेतकऱ्यांसाठी संकटमोचक ठरलेले हवामान तज्ञ पंजाब डख यांचे पुंडा नंदीग्राम नगरीत येत्या २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाऊस कधी येणार, पेरणी कधी करावी, कोणत्या भागात किती पाऊस, हवामान कसे राहणार असे वर्षभर अचूक अंदाज देणारे हवामान अभ्यासक पंजाब डख यांची ओळख महाराष्ट्र भर पसरली आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असेलेले पंजाब डख यांनी गेल्या कित्तेक वर्षा पासून अनेक अडचणी वर मात करत हवामान विषयक अभ्यास ते करीत आहेत. आता शेतकरी वर्ग पंजाब डख यांच्या अंदाजावर आपल्या शेतीच्या मशागतीची रूपरेषा आखताना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला अचूक अंदाज मिळत असतो, त्या आधारावर शेतकरी वर्ग अंदाजावर आपल्या शेतीची कामे करतो. वातावरण बद्दलाबाबत विभागानुसार पंजाब डख यांचे मॅसेज सोशल मीडिया वर येत असतात.
येत्या २४ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुंडा नंदीग्राम नगरीत पंजाब डख यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. जास्तीत जास्त शेतकरी मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळींनी आव्हान केले आहे.