शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : अकोट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात 19 फेब्रुवारीला शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नानासाहेब हींगणकर होते.तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. आशा मिरगे होत्या.प्रमुख अतिथी रा.का अकोटतालुका अध्यक्ष कैलास गोंडचोर,ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष मायाताई कावरे होत्या. शिवजयंती चे पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नोंदणी अभियान व गाव आराखडा अभियानाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील,महीला प्रदेशअध्यक्षा आ.रुपाली चाकणकर,यांचे मार्गदर्शनात तसेच,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.आशाताई मिरगे,जील्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे,विभागीय निरीक्षक आ.वर्षाताई निकम,जिल्हा निरीक्षक आ.सोनालीताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अकोट विधानसभा निरीक्षक मायाताई कावरे यांनी गाव आराखडा अभियानाला व सदस्य नोंदणीला. अकोट तालुक्यातुन शिवपर्वावर सुरवात केली. या बैठकीत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सबंधी तसेच होऊ घातलेल्या नगर परीषद निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. डॉ.आशाताई मिरगे,जेष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर व छायाताई कात्रे महिला प्रदेश सरचिटणीस यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे सभासद नोंदणी पुस्तकाचे नानासाहेब हिंगणकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला जिल्हा उपाध्यक्षा वृंदाताई मंगळे,महिला शहर अध्यक्षा चारुलताई थेटे, जिल्हाउपाध्यक्षजावेद सिदिकी तालुकासचीव नागेश आग्रे ,ओबीसी ता.अध्यक्ष नरेंद्र कोंडे, ओबीसी शहर सचिव अहेमद शेख,मनीष तळोकार अजमतभाई खाॅ, संदेश घनबहादुर,गोलु खलोकार, ईरफान पठाण, रियासत अली देशमुख, सैयद तनवीर, अक्षय बोदळे यांची उपस्थित होते.