स्पर्धेत 18 संघानी घेतला सहभाग.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली:- जनतेचा जानता राजा,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडुु्च्या कलागुणांना वाव देण्यासाठी दि.18/02/022 ते दि.19/02/022 रोजी या दोन दिवसीय भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धा ही पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे आयोजन करण्यात आले.सदर कबड्डी स्पर्धेत उप पोलीस स्टेशन हद्दीतील 18 संघानी आपला सहभाग नोंदवला.या स्पर्धेत प्रथम विजेते बिरसा मुंडा संघ कोरेली(ए संघ) यांनी पटकविला तर द्वितीय विजेते जय सेवा क्लब कोरेली(ब संघ)तसेच तृतीय विजेते पेरसेना संघ पेरमिली यांनी पारितोषिक पटकावले.सदर स्पर्धेचे अध्यक्ष सीआरपीएफ चे असि. कमांडट संतोष कुमार हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पेरमिली गावचे सरपंचा किरण नैताम,मुख्याध्यापक माहुलीकर,मानसेवी डॉ. गणेश मडावी हे उपस्थित होते.स्पर्धा प्रमुख म्हणून प्रभारी अधिकारी धवल देशमुख व पोउपनि अजय राठोड हे होते.त्यानंतर स्पर्धतील विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षीस रोख 3000 रुपये,द्वितीय बक्षीस 2000 रुपये रोख व तृतीय बक्षीस 1000 रुपये रोख तसेच प्रोत्साहनपर उत्कृष्ट रायडर 500 रु रोख,उत्कृष्ट डिफेंडर 500 रु रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धे करिता उपस्थित खेळाडू व नागरिकांना प्रभारी अधिकारी देशमुख यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.उपस्थित खेळाडु व विजेत्या संघाना गडचिरोली पोलीस दलातर्फे अहेरी व गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धकरीता माहीती देण्यात आली की,चांगल्या खेळाचा प्रदर्शन करणारे खेळाडूंना प्रो कबड्डी लीग मध्ये खेळण्याची संधी दिली जाईल. नवयुवकांना खेळातून करीयर घडवण्याची चांगली संधी असल्याचे सांगितले.सदर कबड्डी स्पर्धा यशस्वी करीता उप पोलीस स्टेशन,पेरमिली येथील पोलीस अंमलदार शामराव शेरकी,रोहिदास काळे, अशोक मेंढे,विजय बिश्वास महेश दुर्गे,राकेश उरवेते,विवेक सिडाम, ब्रिजेश सिडाम,मधुकर आत्राम,राहुल खार्डे,शंकर चव्हाण,पंकज दंडीकवार,अविनाश मडावी,तसेच एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार या सर्वांनी मोलाची सहकार्य केले.