माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केला सत्कार.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- अहेरी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक असलेले शैलेश पटवर्धन व नव निर्वाचित नगरसेवका ज्योती सड़मेक यांनी आदिवासी विद्यार्थी संघामध्ये प्रवेश केले.पटवर्धन हे राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून दोनदा निवडून आले असताना त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाले. त्यामुळे पक्षावर नाराज असलेले पटवर्धन यांनी आविस मध्ये प्रवेश केल्याने अहेरी राजनगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.त्यांनी आविस मध्ये प्रवेश करून ते अहेरी नगर पंचायत मध्ये उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले आहे.आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केले.जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या अहेरी ये्थील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख,प.स.सदस्या सुरेखा आलाम,नव निर्वाचित नगरसेवक,विलास गलबले,महेश बाकेवार,रोजा करपेत,मीना ओंडरे,सुरेखा गोडसेलवार,विलास सिडाम,इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,राकेश सडमेक,प्रशांत गोडशेलवार,कार्तिक तोगम,शिवराम पूल्लूरी,मिथुन देवगडे,प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.










