महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुका प्रतिनिधी येथील श्री साई कॉन्व्हेंटमध्ये हि॑दवी स्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल बडकेलवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कु किरण कोथळे, देवानंद जुमडे आदी मान्यवर मऺचावर उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीमेला पुष्प माला अर्पण करून व दिप प्रज्वलन करून शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थितीत ताना शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.यावेळी सुब्रतो मी स्त्री, अर्चना बदखल, बबीता पेटकर, शृंखल पेटकर, प्रतीक्षा येनगु॑टवार, आम्रपाली रामटेके, खुशाली भगत, बुलुरानी शहा, प्रज्ञा दुपारे, सुनील दैदावार, नेहा चव्हाण, स्मीता डाहुले, वैष्णवी कुंभारे, वर्षां गेडाम आदि उपस्थित होते.










