सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : कोविड19 च्या परिस्थिती मुळे सर्वसामान्य शेतकरी व मजूरांचे हाल बेहाल होत आहे.बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.सर्वसामान्यांना रोजगाराची अत्यंतआवश्यकता आहे. ही बाब ओळखून आरमोरी येथील लोकहित संघर्ष समितीच्या नेतृत्वात दि.14 फेब्रुवारी रोजी रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावी.अशी मागणी आरमोरी नगरपरिषद मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.महाराष्ट्र रोजगार हमी कायदा 1977 कलम 2 नुसार ग्रामीण क्षेत्राच्या व्याख्येत क वर्ग नगर परिषद क्षेत्रात समावेश करण्यात आले आहे.क वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राहणाऱ्या अंगमेहनत अकुशल काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील प्रौढ व्यक्तीस रोजगार हमीची कामे देण्यात यावी.असा राज्य सरकार चा परिपत्रक आहे.या परिपत्रकाला अनुसरून रोजगार हमीची कामे सुरू करून सर्वसामान्य शेतकरी मजुरांना कामातून रोजगार उपलब्ध होऊन व त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल.यासाठी लोकहित संघर्ष समिती कडुन आरमोरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर,प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली चे निखिल धार्मिक,युवारंग चे अध्यक्ष राहुलभाऊ जुआरे,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार,वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने उपस्थित होते.