सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : नगरपंचायतचा सार्वत्रिक निवडणूकीत कुरखेडा येथे भाजपा ला स्पष्ट बहूमत मिळूनही बंडखोरी मूळे सत्ता गमविण्याची नामूश्की पत्करावी लागली.या ठिकाणी शिवसेना कांग्रेस आघाडीकडून अध्यक्ष पदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर हे 9 विरूद्ध 8 मताचा फरकाने निवडून आले.येथील अध्यक्ष पदाकरीता शिवसेना कांग्रेस आघाडीचा वतीने अनिता बोरकर यानी नामांकन दाखल केला होता.तर भाजपा चा वतीने अल्का गिरडकर यानी नामांकन दाखल केले होते 9 सदस्य संख्येसह येथे भाजपाला स्पष्ट बहुमत आहे.मात्र अध्यक्ष स्थानावरून पक्षातच एकमत नसल्याने कूरबूरी सूरू होत्या नेमकी हिच परीस्थीती हेरत शिवसेना कांग्रेस आघाडीचा पूढारीनी गूप्त हालचाली करीत भाजपाची नाराज असलेली नगरसेविका जयश्री रासेकर यांचाशी संपर्क साधला व याची भनक सूद्धा भाजपा पूढारींना रविवार सांयकाळ पर्यंत लागू दिली नाही.सोमवार सकाळी बंडखोर भाजपा सदस्य जयश्री रासेकर यानी शिवसेना कांग्रेस आघाडीचा सदस्यासह सभागृहात प्रवेश केला.तेव्हांच परीस्थीती स्पष्ट झाली होती व बहूमतात असलेली भाजपा अल्पमतात आली.शिवसेनेची अनिता बोरकर यानी भाजपाचा अल्का गिरडकर यांचा व उपाध्यक्ष पदाकरीता आघाडीचा वतीने दाखल बंडखोर भाजप नगरसेविका जयश्री रासेकर यानी भाजपा उमेदवार कलाम शेख (बबलू हूसैनी) यांचा 9 विरूद्ध 8 मतानी पराभव केला. निवडणूक परीणामाची घोषणा होताच आघाडीचा पदाधिकारी कार्यकर्त्यानी जल्लोश साजरा केला.याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमूख कीरन पांडव, कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्रम्हाणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमूख सूरेन्द्रसिंह चंदेल,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जिवन नाट,जयंत हरडे,डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी,शोएब मस्तान,आशाताई तूलावी,निरांजनी चंदेल यांचा सह शिवसेना कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यानी काम सांभाळले.