किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथे युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंगीकृत नेहरू युवा केंद्र,अकोला व साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ पातुर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान,पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थळ कान्होबा चौक पातुर येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव व जिल्हा युवा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटन व अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ सिनेमा कलावंत श्री गजानन पोपळघट होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन लोककलावंत शाहीर कविश्वर अवचार व शाहीर मधुकर नावकार तसेच युवा साहित्यिक व पत्रकार श्री संदीप देशमुख व कव्वाल व साहित्यिक मो.सलीम मो.कासम तसेच शासन पुरस्कृत शाहीर विशाल राखोंडे तसेच अँड.शुभांगी उमाळे व सौ नंदिनीताई कांबळे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात ही नटराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार तसेच दिप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे उदघाटन व अध्यक्ष तसेच मान्यवरांचे स्वागत हे वृक्ष व कापडी पिशवी, एनर्जी ड्रिंक, बियाणे किट देऊन करण्यात आले यावेळी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव व जिल्हा युवा संमेलन कार्यक्रमाची माहिती व प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवाश्री विशाल राखोंडे यांनी केले त्यानंतर स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान,पातूर कडून दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार २०२१-२२ हा युवा साहित्यिक व पत्रकार श्री संदीप देशमुख अध्यक्ष तरुणाई फाउंडेशन कुटासा यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रतिष्ठान कडून सन्मानित करण्यात आले यावेळी नंतर जिल्हा युवा संमेलनाला सुरुवात करुन कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर व मार्गदर्शक यांनी उपस्थित युवक व युवतींना तसेच नागरिकांना कलाक्षेत्रा विषयी व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाला सुरूवात ही श्री गणेश वंदना या नृत्याने करण्यात आले त्यानंतर महोत्सवामध्ये विविध लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, लोकगीत, वासुदेव, पोवाडा, गोंधळ, भावगीत, भक्तीगीत, देशभक्ती गीत, कवाली, हास्य कविता तसेच गायन, वादन, संगीत इत्यादी अनेक कलाकारांनी आपली कला महोत्सवात मध्ये सादर केली यावेळी सर्व सहभागी कलाकारांना स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व कापडी पिशवी, एनर्जी ड्रिंक तसेच बियाणे किट देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष लोककवी सागर ना.राखोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पातूर तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कु.पल्लवी मांडवगणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवा स्वंयसेवक हरिओम राखोंडे व नारायण ठाकरे तसेच मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ इंगळे, सुखदेव उपर्वट, सुहास देवकर, गणेश देवकर, प्रज्वल भाजीपाले, सागर पदमने, कु.ज्योती राखोंडे तसेच कान्होबा महिला बचत गट,पातुर कलावंतांचा भोजनाची व्यवस्था करुन यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रवंदना म्हणून करण्यात आली व जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव युवा संमेलन संपन्न झाला.