गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी दि. १४/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र भर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन.मा. तालुका आरोग्य अधिकारी. आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना अकोला-वाशिमच्या वतीने महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात कोविड १९ लसीकरणांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्तीने काम लावण्यात येत आहे. याबाबत कोणताही मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिला जात नाही. आशा स्वयंसेविकांची नेमणूक कामावर आधारीत मोबदला: या तत्वानुसार करण्यांत आलेली आहे. कोविड- १९ च्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळणारा एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता ऑक्टोंबर २०२१ पासून देण्याचे बंद करण्यात आला होता, तो पूर्ववत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोविड १५ च्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना त्यांची मुळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना दरमहा कोविड पूर्व काळात मिळत असलेल्या मोबदल्यापेक्षा सध्या खूप कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान होत आहे, त्यांना मिळणारा तुटपूंजा मोबदलाही वेळेवर दरमहा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाप्रती त्यांच्या भावना संतप्त होवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष देवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचेऑक्टोंबर .नोव्हेंबर.डिसेंबर २०२१ ४ जानेवारी २०२२ या चार महन्यांचे थकीत मानधन त्वरीत देवून येथून पुढे दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन देण्याची व्यवस्था करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तिसऱ्या लाटेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक स्वतःला झोकुन देवून इमानेइतबारे काम करत आहेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कष्टावरच आरोग्य विभागाचे श्रेय टिकुन आहे तेव्हा पहिल्या फळीत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे खालील अत्यंत जिव्हाळ्याचे व तातडीचे प्रश्न विनाविलंब सोडवावेत, ही विनंती.केंद्र शासनाच्या सुधारीत पत्रानुसार ऑक्टोंबर २०२१ पासून कोविड प्रोत्साहन भत्ता आशा स्वयंसेविकांना रु. १०००/- व गटप्रवर्तकांना रु. ५००/- देण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा ऑक्टोंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या चार महिन्याचा प्रोत्साहन भत्ता त्वरीत देण्यात यावा व यापुढे दरमहा नियमितपणे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोविड प्रोत्साहन भत्ता देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी .दानापूर.अडगाव . पंचगव्हान. हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आशा स्वयंसेविका रंजना विनोद वानखडे (अध्यक्ष) जयश्री निलेश देशमुख , राजश्री प्रमोद खुमकर. सुनिता भोपळे, मंजू सदाफळे, जयश्री देऊळकार, चंदा वरठे, आशा राऊत, रेखा वानखडे, पंचशिला दारोकार, रेखा गवई, सिमा भोजने, उषा तिहिले, सारिका वानखडे, महानंदा कौठकार, रिना वानखडे, अलका परनाटे.रेखा नागपूरकर,सिमा भोपळे,आशा कोल्हे, सविता इंगळे, अलका बोदडे. आशा स्वयंसेविका उपस्थित होते.











