गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाल्यामुळे संपूर्ण भारतासह जगभरातील संगीत प्रेमींचे डोळे पाणावल्या गेले. स्थानिक माउली संगीत क्लासच्या वतीने क्लासच्या चिमुकल्यांच्या गीतांनी दिदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळी सुद्धा भारावून गेली होती. माऊली संगीत क्लासचे संचालक विशाल जळमकार यांनी व माऊली ग्रुपने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजे संभाजी अकादमीचे संचालक सुधीर ताकोते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आर्मी पांडुरंग खुमकर तर सुनील ताथोड, प्रा स्वप्नील फोकमारे, वैभव फोकमारे, विशाल नांदोकार, करन शिवणकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे संचालन संगीता काकड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता नयन फुंडकर यांच्या पसायदानाने व श्रद्धांजलीने झाली.