सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील जानेफळ येथे अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेची तालुका बैठक जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी पत्रकारांची सदस्य नोंदणी करुन विविध विषयावर चर्चा करण्यात,यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे यांनी पत्रकारांना संबोधित केले की संघटनेच्या हितासाठी काम करुन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही.सर्वसामान्य माणसांच्या व पत्रकारांच्या समस्या वर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्री आवाज द्या तूमच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने व लेखणीच्या माध्यमातून भ्रष्टचारांची लखत्तरे वेशीवर टांगून त्यांना वठणीवर आणू, त्यासाठी अन्याय अत्याचार विरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी आपणास लढा देयायचा आहे.असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे यांनी केले.तसेच त्यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे मेहकर तालुकाध्यक्ष संतोष अवसरमोल यांनीही पत्रकरांना संबोधित केले की, शाहू, फुले, आंबेडकर, यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वंचित अन्याग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी ही लेखणी अत्याचाराच्या विरोधात आसुड ओढवेल तसेच माझ्या पत्रकारांना कोणी जाणूनबुजून फसवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पत्रकारांना सत्य लिहण्यासाठी धमकावत असेल तर आता आमची संघटना खपवून घेणार नाही.पत्रकारांच्या पाठीमागे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना खंबीरपणे उभी राहिलं असा इशारा मेहकर तालुकाध्यक्ष संतोष अवसरमोल यांनी दिला आहे.या बैठकीला अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती.जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे, जिल्हा सरचिटनीस गजानन दुतोंडे,पत्रकार सुनील मोरे,तालुका अध्यक्ष संतोष अवसरमोल, पत्रकार अमर राऊत, पत्रकार गणेश सवडतकर,उपाध्यक्ष किशोर इंगळे, पत्रकार मुन्ना काळे,अॅड श्याम काळे,पत्रकार मनिष मंडावगडे,पत्रकार सुभाष नरवाडे,पत्रकार दिपक देशमुख, पत्रकार सतिष मवाळ,पत्रकार संतोष जाधव,पत्रकार अनिल मंजुळकर, पत्रकार प्रकाश साखरे, पत्रकार विष्णू वाघ, पत्रकार दिलीप डोमळे, पत्रकार मनिष वानखेडे, पत्रकार गजानन वडूळकर, पत्रकार राजू केदारे, महादेव पाखरे,शेख रफीक,शेख हारुन शेख,माजी सोसायटी अध्यक्ष विठ्ठल वानखेडे सह अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थितीत होते.विशेष म्हणजे या बैठकीत सर्व पत्रकार बांधवांनी भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला. विशेष करून वाढदिवस औदुंबराच्या वृक्षाखाली लाखात एक साजरा होतोय, यावेळी मेहकर येथील पत्रकार संतोष जाधव यांचा वाढदिवसाचा योगायोग की या बैठकीत औदुंबराच्या वृक्षाखाली पत्रकार संतोष जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे सह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी पत्रकार संतोष जाधव यांचे स्वागत करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)