सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : परिसरातील शेतकऱ्यांना धान्य साठवून ठेवण्यासाठी कृषी गोडाऊन नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावे लागत होते.आता शेतकऱ्यांची समस्या दुर होणार असुन पळसगाव येथे तीस हजार मेट्रिक टन धान्य साठवणूकीसाठी कृषी गोडाऊन उपलब्ध होणार आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.पळसगाव येथे पटाच्या वन विभागाच्या मोकळ्या जागेवर सर्वे.नं 315 मधील 6.48 हेक्टर पैकी 0.40 हे.आर.मंजूरी मिळाली आहे.परिसरात दरवर्षी खरेदी-विक्रि मार्फत धान खरेदी केली जाते.माञ कधी-कधी गोडाऊन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची धान्ये विकण्यासाठी उशीर होते.पळसगाव येथील ग्रा.पं.पदाधिकारी तसेच गावकरी यांनी पळसगाव क्षेत्राच्या जि.प.सदस्या मनिषा दोनाडकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्या अनुसंगाने जि.प.सदस्या मनिषा दोनाडकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताची मागणी जोपासत या बाबीची दखल घेऊन सबंधीत विभागाला पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुरावाला अखेर यश आले.त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून भुमिपुजन गडचिरोली जि.प.सदस्या मनिषा दोनाडकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.यावेळी मोहिनी भुषणसिंग खंडाते,सरपंचा जयश्री दडमल,उपसरपंचा सोनी गरफडे,उपविभागीय अभियंता सरदार,ग्रा.पं.सदस्य श्रीरामजी गजबे,प्रिती हजारे,जयश्री मने,विकास चौके,शालिक पञे,चांगदेव दडमल,शंकर लठ्ठे,शाखा अभियंता प्रविण झापे,प्रविण राहटे,ग्रामसेवक पि.व्हि.कोंडावार.बाजीराव बुल्ले,प्रल्हाद नखाते,गणेश मातेरे,सखाराम नखाते,रुषिजी मातेरे,अशोक भोयर,राधेश्याम ठेगंरी,श्रीराम मेश्राम,गिरीधर घोडाम,किर्तीलाल पुराम,विनोद पगाडे,नितिन मने,मुखरु निबांर्ते,शंकर लिगांयत हैदराज भोयर,कञांटदार कुरेशी,हरीराम ठाकरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











