सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
भामरागड : गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी भामरागड तालुक्यात अचानक भेट दिली.जिल्हाधिकारी यांनी सदर भेटीदरम्यान नगरपंचायत भामरागडच्या विविध विकास कामांची पाहणी केली.नगरपंचायत भामरागड येथे नव्याने ताफ्यात दाखल झालेले शववाहिका,व्हॅक्युम एंम्प्टियर,अग्निशमन वाहनांची पाहणी केली.तसेच नगरपंचायत भामरागड करिता विविध प्रयोजनासाठी जमिनीचे आवश्यकते बाबत प्रश्न समजून घेतले.तसेच जमिनीच्या प्रश्नाबाबत स्वत: वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायत भामरागड अंतर्गत चालु असलेले स्वच्छ सर्वेक्षण 2022, माझी वसुंधरा अभियान तसेच विविध योजनेचे आढावा घेतला.तसेच काही कामे स्वत: पाहणी केली.घनकचरा व्यवस्थापन केंद्र आणि एफएसटीपी ला भेट देऊन पाहणी केली.नव्याने नगरपंचायत ने सुरू केलेले आयसीटी बेस्ड प्रणालीची पाहणी केली.जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालय भामरागड येथे सुद्धा भेट दिली.आदिवासी विविध सहकारी संस्था मर्या.भामरागड अंतर्गत धान खरेदी केंद्राच्या कामाच्या चौकशीसाठी त्वरीत दोन अव्वल कारकून व एक महसुल सहायक यांची जागीच नेमणूक करून तात्काळ आदेश निर्गमित केले व त्वरीत अहवाल मागविले.यानंतर जिल्हाधिकारी यांनी भामरागड पासून 18 किलोमीटर असलेल्या लाहेरी या गावाला सुद्धा भेट दिली.सदर भेटीदरम्यान डॉ.सूरज जाधव, मुख्याधिकारी नगर पंचायत भामरागड,अनमोल कांबळे तहसिलदार भामरागड उपस्थित होते.


