किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
बुलढाणा : जिल्ह्यात असलेले ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद जाधव यांचे मार्गदर्शन मध्ये दिनांक 13 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी यूनानी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव भुतेकर तर प्रमुख उपस्थि युनानी तज्ञ डॉ. नजीब अहमद व डॉ. शेख वासिक होते. कार्यक्रमा मध्ये ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा चे युनानी तज्ञ डॉ. गुफरानउल्ला खान यांनी यूनानी औषधी, युनानी पॅथीचे आहार, युनानी योगा व युनानी इलाज बीद तदबीर(युनानी पंचकर्म ) च्या जास्ती जास्त वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवून पैशाची बचत करा असे आवाहन केले. आणि युनानी तज्ञ लिजंड हकीम अजमल खान (1868 ते1927) यांनी युनानी पॅथी ला दिलेला योगदान बद्दल माहिती दिली. व हकीम अजमल खान फक्त यूनानी तज्ञ होते असे नाही ते यूनानी तज्ञ सोबत ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी महात्मा गांधी सोबत मिळून देशासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली, ते भारताची टॉप टेन विद्यापीठ मधून एक जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ दिल्ली चे फाउंडर व मरेपर्यंत कुलगुरू होते. हकीम अजमल खान यांनी हिंदू-मुस्लीम एकतेवर व युनानी आयुर्वेद चे एकत्रीकरण वर खूप योगदान दिले. त्यांचे हे योगदान भारतवासी कधीही विसरणार नाही. या शब्दांमध्ये डॉ. गुफरानउल्ला खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थितीत डॉ. नजीब अहमद व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव भुतेकर ने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे होमिओपॅथिक तज्ञ डॉ. शोएब पटेल, सौ शैला वैराळे सिस्टर, विजय सरकटे, वैभव कदम , अस्मिता वाकोडे सिस्टर, सुरेश इंगोले , सुरेंद्र चव्हाण, शाहरुख खान व इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन महेश पांढरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बी.जी चव्हाण यांनी केले.


