परिसरात चोरटे दाखल झाल्याने भीतीचे वातावरण.
आरमोरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांची होणार तक्रार.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील गांधी चौकात असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरातील लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्री चोरल्याची घटना सकाळी उघडकिस आली.वैरागड गावाच्या मध्यभागी आणि भरभराटीच्या लोकवस्ती असलेल्या, वडाच्या बुद्याखालील छायेत दुर्गा मातेचे मंदिर आहे.या मंदिरात भाविक दररोज पूजा-अर्चा तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जाते.याच मंदिराच्या लोखंडी दरवाज्याला लागून दानपेटी ठेवली होती.भाविकांच्या दानातून मंदिराची विविध कामे केल्या जात होते.अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी दानपेटी लंपास केली.ही बाब दि.11 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास पूजा-अर्चा करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात येताच मंदिरासमोर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.यावेळी नागरिक आणि भाविकांनी अज्ञात चोरट्या विरोधात रोष व्यक्त केला.याच परिसरात मागील वर्षी काही चोरट्यांनी सुभाष हर्षे ज्वेलर्स दुकानात दागिन्यांवर हात साफ केला होता.आता मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरातील नागरिक तसेच व्यावसायिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरी गेलेल्या दानपेटी बाबत आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल.असे दुर्गा माता मंदिराच्या भक्तांनी सांगितले आहे.