महिला व बालकल्याण व अधिकारी हटकर यांनी दिली अंगणवाडी केंद्राला भेट
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत दुर्गम भागात असलेले टिकेपल्ली येथील अंगणवाडी परिसरात अंगणवाडी सेविकेनी परसबाग तयार केली आहे.या परसबागेत मेथी,पालक,सांभार,टमाटर,वांगे,शेंगा,आंबाडी,शेवगा व इतर भाजीपाले लावण्यात आले आहे.अमृत पोषण आहार योजने अंतर्गत गरोदर मातांना अंगणवाडीतील केंद्रामार्फत पोषण आहारात करण्यात येतो.या आहारात परसबागेतील ताजा भाजीपाला वापरण्यात येतो.व तयार केलेला पोष्टीक आहार गरोदर मातांना दिला जात असल्याची माहिती अंगणवाडी सेविका सुनिता कोरेत यांनी दिली.उन्हाळ्याचे दिवसात सुध्दा या परसबागेतील ताजा भाजीपाला पोष्टीक आहारात दिला जातो.ही परसबाग फुलवण्यासाठी सेविका सुनिता कोरेत,मदतनीस सुगंधा सेडमाके,अमृत आहार मदतनीस अंजना सेडमाके यांचे परिश्रम आहेत.या अंगणवाडी केंद्राला मुलचेरा तालुक्याचे महिला व बालविकास अधिकारी विनोद चांदोजी हटकर यांनी अकस्मात भेट देवुन पाहणी केली.याच परसबागेतील भाजीपाला गरोदर मातांना देण्यात येत आहे हे बघुन त्यांनी समाधान व्यक्त केले व परसबाग सुंदर फुलविल्याने सेविका सुनिता कोरेत,मदतनीस सुगंधा सेडमाके व अंजना सेडमाके यांचे त्यांनी कौतुक केले.पुढील वर्षात हीच परसबाग मोठी करुन जास्तीत जास्त ताजा भाजीपाला काढुन त्याचा वापर पोष्टीक आहारात करावा अशा सुचना त्यांनी केली.पेसा अध्यक्ष तुळशीराम मडावी यांचेशी हटकर यांनी चर्चा करुन अंगणवाडी केंद्राला जास्तीत जास्त सहकार्य करण्याची विनंती केली.यावेळी खमलचेरु चे सरपंच सायलु मडावी,शिक्षक प्रकाश दुर्गे हे उपस्थित होते.