मूलचेरात शिवसेनेला मिळाली एकहाती सत्ता.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : नुकतेच झालेल्या नगर पंचायतीचे निवडणुकीचे निकाल लागले त्यात शिवसेनेने अहेरी विधानसभेत जबरदस्त इन्ट्री करून भगवा फडकविला.14 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक असून त्यासाठी 7 व 8 फेब्रुवारीला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करायचे होते.यात अहेरी विधानसभेतील मूलचेरा तालुक्यात शिवसेनेचे एकच नामांकन दाखल झाल्याने घोषणेची औपचारिकता बाकी असून मूलचेरात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली आहे.शिवसेनेचे विकास नैताम अध्यक्षपदाचे आणि शिवसेनेचे शिलेदार ठरणार आहेत.नुकतेच पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत मूलचेरात चार,अहेरीत दोन,सिरोंचात दोन,भामरागड एक तर एटापल्लीत अपक्ष म्हणून निवडून आलेले दोन नगरसेवक सुद्धा निवडणुकीच्या निकाला नंतर लगेचच शिवसेना पक्षात प्रवेश करून एटापल्लीतही खाता उघडल्याचे दाखवून दिले.एकंदरीत अहेरी विधानसभेत तब्बल अकरा नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार आणि अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी यशाची किमया केली आहे.येत्या 14 फेब्रुवारी रोजी नगर पंचायत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मोलाची भूमिका राहणार असून राजनगरी अहेरीत आविस सोबत सत्ता स्थापणार असल्याचे संकेत व चिन्हे दिसत असून तसे झाल्यास अहेरीसाठी पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय राहणार आहे.एकंदरीत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून राज्याचे नगर विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख, कट्टर शिवसैनिक तथा मूलचेराचे तालुका प्रमुख गौरव बाला यांचे जबरदस्त नियोजन,संघटन व नेतृत्व आणि अन्य शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेहनतीने अहेरी विधानसभेत शिवसेनेचा बोलबाला बनला असून शिवसेनेचा डंका वाजत आहे.