पोलीसांनी आंदोलकांना केली अटक व सुटका.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : वैनगंगा नदिवरील पुलावर कठडे लावण्यास प्रशासन डोळेझाक करीत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.8 फेब्रूवारी रोजी लोकहीत संघर्ष समितिच्या वतीने ब्रम्हपुरी गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदिलगत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प पडली होते.सर्वप्रथम आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात नारेबाजी करून राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध टायर जाळून निषेध केला.यानंतर शेकडो आंदोलकांनी पूर्ण रस्ता जाम करून तब्बल दीड तास पर्यंत वाहतूक विस्कळीत केली.सदर आंदोलन आणखी जास्त चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.व त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.चक्काजाम आंदोलनात माकपचे अमोल मारकवार,प्रहार जनशकी पक्ष गडचिरोलीचे निखिल धार्मिक,युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजित बनकर, शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे,जिल्हा संघटक राजू अंबानी,जिल्हा सचिव,वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था अध्यक्ष देवानंद दुमाणे,भाकपचे शहर सचिव संजय वाकडे, प्रफुल खापरे, नगरसेविका सिंधू कापकर,शुभांगी गराडे,मीनल बनसोड,मिनाक्षी सेलोकर,छाया मानकर,देविदास काळबांधे,शाबीर शेख,राकेश सोनकुसरे,अंकुश गाढवे,रिंकू झरकर, अक्षय भोयर,विनोद निमजे,सारंग जांभुळे,प्रथमेश साळवे,विनोद निमजे,अक्षय बोरकर,निखिल बनसोड,उमेश पिंपळकर,अरविंद धकाते,अनंता भोयर,मनोज गेडाम,श्रीराम ठाकरे,प्रशांत सोरते,अजय कुथे,अजय खेडकर,अभिषेक जुआरे,विद्या मेश्राम,सुरज पडोळे,दिवाकर गराडे,केवळ दुमाणे,अनंत भोयर,अंकुश दुमाणे,विकास धादरे,हर्ष भोयर,दीपक सोनकुसरे नेपचंद्र पेलणे,विशाल चौके,तुषार शिलार ,मयूर दिवटे,वसीम शेख,निखिल दिवटे,सचिन लांजेवार,कुणाल भरणे,किशोर जावंजलकार,तसेच मनसे,युवारंग,प्रहार,माकप,भाकप, शिवसेना,वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आदी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


