थकीत कर मार्च अखेर जमा करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची केली आहे.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : ग्रामपंचायतचे घर कर,पाणी कर,वीज कर तसेच ग्रामपंचायती तर्फे येणाऱ्या विविध करा बाबत मार्च अखेरीस नागरिकांनी भरणा करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दारोदारी पायपीट सुरू आहे.ग्राम विकास करण्यासाठी दरवर्षी स्थानिक नागरिकांकडून ग्रामपंचायत कर वसुली करीत असते.शासन नियमानुसार मिळणाऱ्या करानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन,गावातील स्वच्छता,पाणी समस्या,गावातील वीज पुरवठा आणि गाव विकासासाठी लागणारा खर्च नागरिकांकडून कर वसुलीद्वारे ग्रामपंचायत खर्च करीत असते.कुटुंब कर भरण्यासाठी वर्षांनो- वर्षांनी ग्रामपंचायतीला कलाटनी देत असल्याने ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना कर वसुलीसाठी घरोघरी पायपीट करावी लागत आहे. नागरिकांनी असलेला थकीत कर मार्च अंतिम पर्यंत भरणा करावे असे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे कर्मचारीनी केली आहे.











