सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
डोणगाव : बुलढाणा जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी डोणगाव यांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून पक्षकार्य व समाजकार्य मोठ्या प्रमाणात घडो यासाठी भगवान शिवजी यांना दुग्धाभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जाप ओलांडेश्वर संस्थान डोणगाव येथे करण्यात आला तसेच सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व मदन वामन पातुरकर विद्यालय डोणगाव विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून मुख्याध्यापक राजेंद्रजी उमाळे सर यांना वृक्ष भेट देण्यात आले यावेळी सर्व शिक्षक रुंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा पदाधिकारी अर्जुन राव वानखेडे, विलास परमाळे भाजपा शहराध्यक्ष ,सागर बाजड युवा ता.आद्यक्ष सौ ज्योती बुरखंडे महिला शहराध्यक्ष, आमोल बेदकर युवा मोर्चा शहराध्यक्ष, आकाश बाजड, बबन मामा भुजबळ, देवीदास चव्हाण, गणेश जाधव, जयपाल मीस्तरी, विजु पंडीतकर ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.