महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : मागील काही दिवसापासून ब-याच लोकांना कौन बनेगा करोडपतीच्या नावानी बनावटी फोन, व्हॉट्सॲप मॅसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवून कौन बनेगा करोडपतीमध्ये ₹ २५०००००/- ची लाॅटरी लागली असे सांगण्यात येत आहे आणि ती लागलेली लाॅटरी क्लेम करण्यासाठी नागरिकांकडून बॅंक डिटेल आणी इतर अत्यावश्यक माहिती मागीतली जात आहे. ज्या द्वारे लोकांच्या बॅंक अकाऊंट मधून पैसे लंपास होण्याची दाट शक्यता आहे. सदर माहीती ग्राहक पंचायत भद्रावती ने पोलिस स्टेशन भद्रावती यांना दिली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावटी फोन, व्हॉट्सॲप मॅसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवून नागरीकांना आर्थीक आणी मानसिक त्रास देणा-या व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भद्रावती चे ठाणेदार यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक, चंद्रपुर यांना केली आहे.यावेळी निवेदन देतांना ग्राहक पंचायत भद्रावती चे पदाधिकारी पुरूषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, प्रविण रामचंद्र चिमुरकर, अशोक शेंडे आणि सुदर्शन तनगुलवार उपस्थित होते.ग्राहक पंचायत भद्रावती कडुन सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, कौन बनेगा करोड़पती, लॉटरी, लोन, टेलीकॉम कंपनी किंवा सरकार कडुन पैसे मिळण्याबाबत फोन कॉल, व्हॉट्सॲप मॅसेज, फोन मॅसेज आले असल्यास कोणीही व्यक्ती ने आपल्या बॅंकेची माहीती देवु नये.