किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : जगदंबा देवीसंस्थान ( खडकेश्वर वेटाळ ) पातुर येथुन श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे दरवर्षी प्रमाणे पायदळवारी निघाली आहे पायदळ वारी मधे १५० भक्तांचे आॕनलाईन दर्शनाच्या पासा काढल्या आहेत दिंडी देवीसंस्थान मधुन सकाळी ७ वाजता निघाली असुन बेलुरा फाटा येथे दुपारी १२ वाजता पोहचल्यावर तेथे भक्तांनसाठी नास्त्याची सोय करण्यात आली चंदु बारतासे .जिवन ढोणे . अनिल निमकंडे यांनी व्यवस्था केली तसेच बाळापुर येथे तपे हनुमान मंदिरावर दिंडी संध्याकाळी ६ वाजता पोहचली तेथे रात्रभर मुक्काम असल्यामुळे भक्तांच्या सेवेसाठी वैघकीय व्यवस्था करण्यात आली डाॕ, नंदकीशोर राऊत. डाॕ. अविनाश राऊत यांनी तपासणी करुन भक्तांनवर ऊपचार केले औषध गोळ्या ची व्यवस्था ही अंकीत मेडीकल चे रवी देवकर यांनी केली दि. ३/२/२०२२ रोजी दिंडी सकाळी तपेहनुमान मंदिरावरुन प्रस्थान करुन नागझरी मार्गे शेगाव येथे दुपारी १२ वाजता पोहचते. अशी माहीती दिंडी प्रमुख अंबादासभाऊ देवकर यांनी दिली.