वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ : कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डीवरे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर या घटनेने भांब (राजा) या गावात चांगलीच खळबळ उडाली , यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) या गावात घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी सुनील डीवरे यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर ही घटना रात्री ७ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. डीवरे हे यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते असुन त्यांची मास्क लावून आलेल्या २ ते ३ तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली. जखमी झालेल्या डिवरे यांना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यवतमाळ येथील शासकीय डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.