गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : हिवरखेड येथील कला शिक्षक वैभव पोटे यांनी भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या स्पर्धेत वैभव पोटे यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला, त्यामधे महाराष्ट्राची ओळख वारकरी संप्रदाय नुसार
मानली जाते त्यानुसार मराठी परंपरेचा आणि पंढरपूर हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध देवस्थानापैकी एक देवस्थान विठ्ठलरुक्मिणीचे प्रतिम मानले जाते व वारकरी यांचे मुळंस्थान पंढरपूर असल्याने वैभव पोटे यांनी ३१ जानेवारीला वारकरी ह्यांची रांगोळी काढली, ही रांगोळी रेखाटण्यासाठी १६ तास वेळ लागला व ह्या रांगोळी ची साईज ४× ५ फूट एवढी आहे, हुबेहूब वारकऱ्यांची जिवंत रांगोळी काढली, या रांगोळी मध्ये पंढरपूरच्या विठोबा सोबत वारकरी यांची प्रतिमा रेखाटली आहे, हे रांगोळी पाहण्यासाठी गावातील नागरिकांनि हजेरी याच्या लावली रांगोळी पाहणा? डोळ्यांचे पांग फेडणारी आहे. वैभव पोटे याचे कौतुक करून पुष्पगुच्छानि वैभव पोटे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित अनिल लोणकर, गोकुळ हिगणकर, मनोज भगत, प्रथमेश लोणकर, श्रेयश लोणकर, प्रथमेश भूडके, हर्षल पोटे, रोहित सोनोने तसेच मनसुवर्ण प्रतिष्ठानचे पदाधिकारी विद्यार्थी व उपस्थित होते.


