विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल AJFC राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी अकोट येथील पत्रकार निलेश पोटे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे नियुक्ती पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. निलेश पोटे यांनी AJFC संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील पत्रकारांची मोठी फळी तयार केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी निलेश पोटे यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या पदाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय जिल्ह्यातील सर्व पत्रकार व मित्र परिवाराला देत आहेत.


