गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : मनब्दा ग्रामपंचायतने कोणतीही पूर्वसूचना न देता शौचालयाचा खड्डा फोडला, त्यामुळे कुटुंबास उघड्यावर शौचास जावे लागत आहे, असा आरोप करत गोपाल गतमने यांनी प्रजासत्ताकदिनी पंचायत समिती तेल्हारा समोर आमरण धरणे उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतने वृक्षतोड़ केली या तक्रारीचीही दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मनब्दा येथील ग्रामपंचायतने गोपाल गतमने यांच्या जागेतील शौचालयाचा खड्डा फोडला त्याच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अतिक्रमण केले त्यांच्या जागेतील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. ग्रामपंचायतने गतमने यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही याबाबत लेखी तक्रार करून झालेले नुकसान भरपाई व दोषींवर कारवाईची मागणी केली ; पण त्यावर दखल घेतली नाही त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताकदिन गोपाल गतमने यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले. याबाबत गटविकास अधिकारी बारगिरे यांचेशी संपर्क साधल असता त्यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्यांस सोबत घेऊन चौकशी क व दोषींवर कार्यवाही करू याबाबत उपोषणकर्ते याना लेखी अवगत करून उपोषण सोडण्याची विनंती केली आहे मात्र त्यांनी उपोषण न सोडता चौकशी करा, असे सांगितल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली.