अहेरी पो.स्टे.येथे गुन्हा दाखल.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे काम सांभाळणारे लाॅयडस् मेटल्स एन्ड एनर्जी लिमीटेड या कंपनीचे उपाध्यक्ष अतूल खाडीलकर यांनी अहेरी विधानसभाचे आमदार धर्मराव बाबा आञाम यांच्या नातेवाईक बद्दल अपशब्ध बोलल्या कारणाने दि.२४ जानेवारीच्या रात्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांचेसह इतर लोकांनी खाडीलकर यांचे आलापल्ली येथील राहते घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात अतूल खाडीलकर यांनी मंगळवारी अहेरी पोलीस स्टेशन येथे प्राथमिक तक्रार नोंदवली आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे सुरजागड प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अतूल खाडीलकर हे हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईकासंदर्भात सहन न होण्यासारखे बोलले त्यामुळे संतप्त झालेल्या हलगेकरांनी आपल्या साथीदारांसमवेत खाडीलकरांच्या आलापल्ली येथील अस्थाई निवासस्थानावर जाऊन त्यांना मारहाण केली. खाडीलकरांच्या तक्रारीनंतर अहेरी पोलीसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, जे.डी., भोजराज व इतर जणांवर भादंवि चे कलम ४५२, ३२३, ४२७, १४३, १४७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवला असून पूढील तपास अहेरीचे ठाणेदार शाम गव्हाणे हे करीत आहेत.


